The blog is meant to publish write ups, poems and photographs. This is to share and interact with the bloggers world over.
Wednesday, September 19, 2012
वेळेच एक कोष्टक असत ते पाळाव लागत . वेळ मिळत नाही, वेळ पुरत नाही, वेळ जात नाही. वेळ कसा घालवावा काळात नाही. वेळ येते,
वेळ निघून जाते. वेळेवर निजावं वेळेवर उठाव वेळेवारी खाव, वेळेवर प्यावं. वेळच्यावेळी काळजी घ्यावी, वेळेवर अभ्यास करावा म्हणजे वेळ वाया जात नाही.
वेळात वेळ काढावा चांगल्या गोष्टींसाठी. वेळीच चांगल्या सवयी लावाव्या, वेळच्यावेळी काम केली कि वेळ वाचतो.
काळ आला पण वेळ आली नव्हती. काळ कोणत्या वेळी घाला घालेल काही सांगता येत नाही, आज त्याची वेळच वाईट होती.
वेळाकालाच काही बंधन आहे का? ही काय घरी यायची वेळ आहे का? ही बाहेर जायची वेळ नाहीये. वेळेवर कर भरावा, वेळीच आळा घालावा. वेळेवर तपासून घ्यावं, वेळीच औषधोपचार करावा. योग्य वेळ आली की बोलाव, योग्य वेळेची वाट बघावी. वेळाच काय; तो वाळू हातातून सरावी तसा सरतो.
वेळ लागणार नाही न? वेळ झालाय नाही यायला? इतका वेळ कुठे होतात? गाडी वेळेवर आली आणि वेळेवर सुटलीही गाडी वेळेवर कधीच येत नाही की वेळेवर सुटतही नाही. बसेसच एक वेळापत्रक असत तरीही त्या कधी वेळेवर धावत नाहीत.
वेळीच लग्न झालेलं बर असत वेळीच मुलेही व्हावीत हे उत्तम! म्हणजे जबादारीतून वेळेवर मोकळे होतो.
वेळ कधी सांगून येत नाही हो. वेळीच गैरसमज दूर करावे म्हणजे बर असत. मला तुमचा थोडासा वेळ हवा होता....आत्ता वेळ नाही माफ करा पुढच्या वेळी नक्की हं! आपण वेळ ठरवून भेटूया!! वेळात वेळ काढून आलात बर वाटलं. वेळ चांगली म्हणूनच निभावल नाही तर....
वेळखाऊ प्रकरण आहे एकंदरीत! टी व्ही बघण्यात फार वेळ घालवू नये. दिवसातून किती वेळा सांगितला तरी ऐकत नाही. मुलांना वेळ द्यावाच लागतो. त्या वेळाच सार्थक होत. नाहीतर मुलांना वेळ दिला नाही ह्याची रुखरुख लागते.
दिलेली वेळ पाळावी. वेळेच उत्तम नियोजन करेल तो यशस्वी होईल. वेळेच महात्म्य हो! कार्यक्रम अगदी वेळेत सुरु झाला आणि वेळेत संपलाही माझा वेळ आज बारा गेला. वेळ कुठे गेला कळलंच नाही.
वेळेवेळी सांगूनही ऐकल नाही की अशी पश्चात्तापाची वेळ येते. गेलेला वेळ कधीच परत येत नाही. वेळेचा अपव्यय टाळावा.
आज मला आजीबात वेळ नाही.........आज मला वेळाच वेळ आहे.
मुक्ती पानसे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment